Sai Sudharsan becomes first batter to score 500 runs in IPL 2026
esakal
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi Update: आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत अव्वल चारमध्ये राहण्यासाठी गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अहमदाबादमध्ये GT आणि SRH यांच्यातील सामन्याचा विजेता १६ गुणांसह इतर सर्वांना मागे टाकून गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचेल. या हंगामात GT आणि SRH पहिल्यांदाच एकमेकांसमोर येत असून, या सामन्यातील डाव अत्यंत महत्त्वाचा आहे. गुजरातने घरच्या मैदानावरील तिन्ही सामने जिंकून हैदराबादवर ५-१ अशी भक्कम आघाडी घेतली आहे. साई सुदर्शनने ( Sai Sudharsan) गुजरातच्या डावारा आधार दिला आणि हैदराबादसमोर सन्मानजनक धावसंख्या उभी केली. वॉशिंग्टन सुंदरनेही अर्धशतक झळकावले.