
शुक्रवारपासून (२० जून) भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात असून भारताने दमदार सुरुवात केली आहे.
ही मालिका तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जात असून हेडिंग्ले कसोटीपासून भारत आणि इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतील मोहिमेलाही सुरुवात केली आहे. दरम्यान, या सामन्यात एक अनोखा योगायोगही पाहायला मिळाला आहे.