England Cricket Team
Sakal
Cricket
T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग
Sam Curran Vows to Silence Wankhede in India vs England T20 WC Semifinal: टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने या सामन्याबाबत चुरशीचा सामना होईल असे मत व्यक्त केले आहे.
Sam Curran on India vs England T20 WC Semifinal: सलग तिसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीत आम्ही एकमेकांविरुद्ध लढणार आहोत. त्यामुळे गुपित काहीच नाही. चुरशीचा सामना होईल, असे मत इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) गुरुवारी होणाऱ्या भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्याबाबत व्यक्त केले.
२०२२, २०२४ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही भारत-इंग्लंड (India vs England) उपांत्य सामने झाले होते. त्यात २०२२ मध्ये इंग्लंडने १० विकेटने, तर २०२४ मध्ये भारताने ६८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता तिसरी लढत कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली आहे.

