

भारतीय संघाचा अष्टपैलू युवराज सिंग आणि एमएस धोनी अनेक वर्षे एकत्र खेळले आहेत. त्यांनी २००७ टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कपही एकत्र जिंकून दिला होता. त्यांच्यात अनेक चांगल्या भागीदाऱ्याही झाल्या. युवराज (Yuvraj Singh) धोनीच्या नेतृत्वाही बरेच वर्षे खेळला. मात्र २०२४ नंतर त्याला फारशी संधी मिळाली नाही. तो संघातून आत-बाहेर होत राहिला.
याबाबत युवराजचे वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी त्याला एमएस धोनीकडून (MS Dhoni) योग्य वागणूक मिळाली नसल्याचे आणि त्याला संघातून वगळल्याचे आरोप सार्वजनिकरित्या अनेकदा केले आहेत. मात्र आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी निवडकर्ते संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी वेगळाच खुलासा केला आहे.