

Sanjay Manjrekar on Virat Kohli's Test Retirement
Sakal
Sanjay Manjrekar on Virat Kohli's Test Retirement: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. सध्याच्या काळातील फॅब फोरमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहली, जो रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन यांच्यामध्ये कसोटीतून निवृत्ती घेणारा विराट (Virat Kohli) पहिलाच खेळाडू.
एकिकडे स्मिथ, रुट आणि विलियम्सन हे तिघेही कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय असताना आणि अद्यापही चांगली कामगिरी करत असल्याचे पाहून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी विराटवर निशाणा साधला आहे.