
Sanju Samson Indian squad 2025 Champions Trophy : भारतीय संघ येत्या शनिवारी किंवा रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठीच्या संघाची घोषणा करण्याचा अंदाज आहे. BCCI कडून जाहीर होणाऱ्या या संघात संजू सॅमसनचे नाव दिसणार नाही, हे निश्चित आहे आणि त्यामागे मोठं कारण आहे. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी केरळ संघात स्थान न मिळाल्याने, त्याचे CT25 साठीची दावेदारी त्याला सोडावी लागली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करून संजूचे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावा सांगण्याचे लक्ष्य होते, परंतु केरळ क्रिकेट असोसिएशनने ( KCA) मोठा डाव खेळला...