संजू सॅमसन आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्याची चर्चा आहे.
राजस्थान रॉयल्सकडून २०२५ मध्ये संजूसाठी १८ कोटी पगार दिला जात आहे.
२०१८-२०२१ दरम्यान त्याचा पगार ८ कोटी होता, तर २०२२-२०२४ मध्ये १४ कोटी मिळाले.
Sanju Samson IPL 2026 salary with Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा आहे. संजूने राजस्थान फ्रँचायझीकडे त्याला रिलीज करण्याची विनंती केल्याचेही वृत्त आहे आणि त्यामुळे तो आयपीएलच्या पुढील पर्वात पिवळ्या जर्सीत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. पण, RR कडून संजूला ट्रेड करण्यासाठी CSK ला तेवढी मोठी रक्कमही मोजावी लागणार आहे. त्यासाठी राजस्थआन त्याला नेमका किती पगार देत होतं हे जाणून घ्यावे लागेल.