राजस्थान रॉयल्सचा ( RR ) कर्णधार संजू सॅमसन या इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात नव्या संघात दिसण्याची चर्चा सुरू झाली आहे. राजस्थान रॉयल्सला IPL 2025 मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून हा संघ तालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. संजूला दुखापतीमुळे लीगमधील पाच सामन्यांना मुकावे लागले होते आणि त्याच्या अनुपस्थितीत रियान परागने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. संजूला ९ सामन्यांत ३५.६३ च्या सरासरीने २८५ धावा करता आल्या होत्या. आता तो आयपीएल २०२६ मध्ये नवीन संघाकडून खेळणार असल्याची चर्चा त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरून सुरू झाली आहे.