Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

Sanju Samson Not Fully Fit? : आशिया कप २०२५पूर्वी टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचा भरवशाचा फलंदाज संजू सॅमसन सराव सत्रादरम्यान वेदनेत लंगडताना दिसला. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट दिसत होते.
Sanju Samson limping in pain during practice session ahead of Asia Cup 2025

Sanju Samson limping in pain during practice session ahead of Asia Cup 2025

esakal

Updated on
Summary
  • आशिया चषक २०२५ पूर्वी दुबईत सराव सत्रात संजू सॅमसन लंगडताना दिसला.

  • संजूच्या चेहऱ्यावर वेदनांचे चिन्ह स्पष्ट दिसले आणि त्याच्या तंदुरुस्तीबाबत शंका निर्माण झाली.

  • केरळ क्रिकेट लीगमध्ये त्याने शतक आणि तीन अर्धशतक झळकावून उत्तम फॉर्म दाखवला होता.

Sanju Samson limping during India practice session : भारतीय संघाची आशिया चषक २०२५ स्पर्धेपूर्वी डोकेदुखी वाढवणारी बातमी दुबईहून आली आहे. टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज संजू सॅमसन आज सराव सत्रात लंगडताना दिसला. त्याच्या पायात वेदना होत होत्या आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होते. प्लेइंग इलेव्हनमधील स्थानाच्या चर्चा सुरू असताना संजूने केरळ क्रिकेट लीगमध्ये एक शतक अन् तीन अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे निवड समिती त्याला वगळण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र, आताच्या परिस्थितीत तो पूर्णपणे तंदुरुस्त तरी आहे का? असा प्रश्न पडतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com