

Sanju Samson, MD Nidheesh | SMAT 2026
Sakal
Syed Mushtaq Ali Trophy, Maharashtra s Kerala: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ स्पर्धेत पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राचा सामना न्यू चंदीगढ येथे केरळविरुद्ध सोमवारी (१६ नोव्हेंबर) झाला. या सामन्यात केरळने ९४ धावांनी विजय मिळवला. केरळच्या विजयात कर्णधार संजू सॅमसन, रोहन कुन्नुमल आणि एमडी निधीश यांचा मोलाचा वाटा राहिला.
या सामन्यात केरळने महाराष्ट्रासमोर २११ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण महाराष्ट्राचा संघ ११७ धावांवरच सर्वबाद झाला. केरळकडून एमडी निधीशने ५ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.