Sanju Samson to join CSK in IPL 2026 through trade : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही माजी संघांना इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानासाठी संघर्ष करताना दिसले. पण, लीगच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही संघातील युवा खेळाडूंनी दम दाखवताना आयपीएल २०२६ साठी आशादायक चित्र दाखवले. CSK साठी आयुष म्हात्रे, डेवॉल्ड ब्रेव्हिस, उर्विल पटेल, तर RR साठी वैभव सुर्यवंशी यांनी आशेचा किरण दाखवला. त्यात आता दोन्ही संघांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.