T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

India vs England T20 World Cup Semi Final Marathi: मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळायचे, याचा धडा संजू सॅमसनने पुन्हा एकदा शिकवला. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीत त्याने ८९ धावांची तुफानी खेळी करत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झाला.
Sanju Samson 89 runs vs England T20 World Cup Semi Final ( Photo Credit : Vijay Bate)

Sanju Samson 89 runs vs England T20 World Cup Semi Final ( Photo Credit : Vijay Bate)

esakal

Updated on

T20 World Cup India vs England Semi Final Marathi Cricket News: मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने ( Sanju Samson) पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोप देताना ८९ धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्याच्या या खेळीने इंग्लंडच्या आत्मविश्वासाचा चुराडा केला. भारतीय फलंदाजांनीही संजूने रचलेल्या पायावर धावसंख्येचे मोठे इमले रचले.. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सर्वात वेगवान शतकांमध्ये दुसरे स्थान पटकावले. संजूने आज विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आणि भारताने दोनशेपार धावांचा डोंगर उभा केला. वर्ल्ड कप नॉक आऊटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठऱली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com