
BCCI selection process controversies involving Sanju Samson : चार दिवसांपूर्वी बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला. पण, अजूनही या संघातील खेळाडूंच्या निवडीवरून चर्चा सुरू आहे. संजू सॅमसन ज्याने भारताकडून मागील वन डे सामन्यात शतक झळकावले होते, त्याला या संघात स्थान मिळणे अपेक्षित होते. पण, निवड समितीने लोकेश राहुल व ऋषभ पंत हे दोन यष्टिरक्षक-फलंदाजांचे पर्यात संघात घेतले. शिवाय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ७७९ धावा करणाऱ्या करुण नायर यालाही संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.