

Sanju Samson scored a blazing 46 off 28 balls with 8 fours and 1 six
esakal
Kerala vs Mumbai SMAT 2025 match highlights and summary : स्टार खेळाडूंचा भरणा असलेला केरळ आणि मुंबईचा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आज समोरासमोर आले. केरळचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि संजू सॅमसन याने ( Sanju Samson) आक्रमक सुरुवात करून देताना ४ षटकांत ४२ धावा फलकावर चढवल्या. संजूने मागील दोन सामन्यांत नाबाद ५१ ( ४१ चेंडू) व ४३ ( १५ चेंडू) धावा करून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवले. त्याने आजही वादळी खेळी केली, परंतु शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) मोक्याच्या क्षणी चतुराईने संजूची विकेट काढली आणि केरळच्या धावगतीला लगाम लावली.