Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

10 Fours, 6 Sixes! Samson’s Ton Rewrites IPL Record Books: Sanju Samson याने IPL 2026 मध्ये झळकावलेल्या शानदार शतकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. १० चौकार आणि ६ षटकारांसह खेळलेल्या या खेळीमुळे तो केवळ सामना गाजवून गेला नाही, तर इतिहासातही आपले स्थान पक्के केले.
Sanju Samson’s Record-Breaking Century

Sanju Samson’s Record-Breaking Century

esakal

Updated on

Samson Creates History: Joins Elite Club, Leaves Gilchrist Behind : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडला चोप देणाऱ्या संजू सॅमसनने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुरुवारी शतकी खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सने अन्य फलंदाज ढेपाळत असताना संजू शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर उभा राहिला आणि शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना तो एकटा पुरून उरला. त्याने ५४ चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांसह १०१ धावांची नाबाद खेळी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com