Role of Charulatha in Sanju Samson cricket career
ESAKAL
Behind Sanju Samson’s Calm Smile Stands Charulatha’s Strong Wall: संजू सॅमसनने काल ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जगाला दाखवून दिले की संधी मिळाली तर मोठ्या व्यासपीठावर तो काय करून दाखवू शकतो... तसं संजूने २०१५ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले, परंतु आकडेवारी पाहिल्यास त्याच्या वाट्याला १०-१२ वर्षांत फक्त ७६ आंतरराष्ट्रीय सामने आले. वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरलेला.. त्यामुळे त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या निवडीवरूनही बरीच टीका झाली... शुभमन गिल संजूची जागा अडवतोय, अशी बोंब ठोकणारेही संजूचा फॉर्म पाहून त्याच्यावर चिडलेले... पण, काल संजूने इडन गार्डन्सवर जो खेळ केला, तो सर्वांना पुन्हा एकदा विचार करायला लावणारा होता.