संजू सॅमसनने आशिया चषक निवडीपूर्वी स्थानिक सामन्यात फॉर्मात परतल्याची झलक दाखवली.
KCA Secretary’s XI विरुद्ध KCA President’s XI सामन्यात त्याने ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली.
फक्त फलंदाजीतच नव्हे तर सॅमसनने स्लीपमध्ये अविश्वसनीय झेलही टिपला.
Sanju Samson batting highlights before India squad selection : संजू सॅमसनला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये दुखापतीमुळे संघर्ष करावा लागला होता आणि त्यामुळे आशिया चषक स्पर्धेसाठी त्याची निवड होईल का, चर्चेचा विषय आहे. दुखापतीमुळे राजस्थॉन रॉयल्सने काही सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. संजू फक्त फलंदाज म्हणून खेळला होता, परंतु त्याची कामगिरी काही चांगली झाली नव्हती. पण, आता आशिया चषक स्पर्धेपूर्वी त्याने स्थानिक सामन्यात खणखणीत अर्धशतक झळकावले आणि स्लीपमध्ये अविश्वसनीय झेलही घेतला.