IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

Suryakumar Yadav salute after Samson match winning knock: संजू सॅमसनच्या अविस्मरणीय खेळीने भारताला मोठा विजय मिळवून दिला आणि स्टेडियममध्ये ‘वंदे मातरम्’चा गजर घुमला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात संजूने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. प्रत्येक फटक्यानंतर चाहत्यांचा जल्लोष वाढत गेला.
Vande Mataram celebration IND vs WI viral video

Vande Mataram celebration IND vs WI viral video

esakal

Updated on

Vande Mataram celebration IND vs WI viral video: चांगल्या लोकांसोबत, चांगलंच होतं... सूर्यकुमार यादवने काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेले हे विधान आज संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) बाबतीच तंतोतंत खरे ठरले. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संजूला पुन्हा संधी मिळाली आणि त्याने आक्रमक खेळ करून वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत आपली जागा पक्की केली. संजूला याच दिवसासाठी, याच खेळीसाठी टीम इंडियाने राखून ठेवलं होतं, असं आज जाणवलं. कारणस १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकट्या संजूने ९७ धावांची नाबाद खेळी केली. अन्य फलंदाजांना ३० हून अधिक धावाही करायला नाही जमल्या... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यात संजूने जेव्हा विजयी चौकार खेचला, तेव्हा इडन गार्डनवर एकच जल्लोष झाला...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com