सारा तेंडुलकरचा गोव्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तिच्यासोबत सिद्धार्थ केरकर दिसतोय.
शुभमन गिलसोबतच्या तिच्या नात्यावर नेहमी चर्चा रंगते, त्यामुळे या फोटोंवरून नेटिझन्सनी मीम्स केले.
सिद्धार्थ केरकर हा गोव्यातील रेस्टॉरंटचा सह-मालक असून त्याचे ९० हजारांहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.
Sara Tendulkar’s viral Goa photo with Siddharth Kerkar: सारा तेंडुलकर ही सोशल मीडिया क्विन आहे आणि तिच्या प्रत्येक फोटो व व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळतो. सारा आणि भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा नेहमी रंगत असते. साराने नुकताच स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि भ्रमंती करण्याचीही खूप आवड आहे. अशाच तिचा गोव्यातील एक फोटो सध्याचा चर्चेचा विषय बनला आहे. तिच्यासोबत एक मुलगा दिसतोय आणि फोटोंमध्ये सारासोबत असलेला तो मुलगा कोण आहे? सोशल मीडियावर याबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, त्याचवेळी शुभमन गिलसोबत धोका झाला, असेही मीम्स व्हायरल झाले आहेत.