Saransh Jain: वडिलांनी मुलासाठी कॅन्सरच लपवला! आज तोच खेळाडू टीम इंडियात; भावूक कहाणी डोळे पाणावेल

SARANSH JAIN'S EMOTIONAL JOURNEY: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात प्रथमच निवड झालेल्या सारांश जैनच्या यशामागे त्याच्या वडिलांचा मोठा त्याग आहे. मुलाचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी स्वतःचा कॅन्सरही त्याच्यापासून लपवला होता.
SARANSH JAIN'S EMOTIONAL JOURNEY

Saransh Jain

esakal

Updated on

SARANSH JAIN'S EMOTIONAL JOURNEY: भारतीय संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर लोकेश राहुल या मालिकेत उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे.

या संघात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे सारांश जैन. मध्य प्रदेशचा हा युवा अष्टपैलू खेळाडू पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात निवडला गेला आहे. ऑफ-स्पिन गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. मात्र, त्याचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्याच्या यशामागे त्याच्या वडिलांचा मोठा त्याग दडलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com