SARFARAZ KHAN COMEBACK: १७ किलो वजन कमी... काश्मीरमध्ये तासन्‌तास सराव; सर्फराझ खानने टीम इंडियात कमबॅकसाठी काय काय केलं?

Sarfaraz Khan Comeback: सर्फराझ खानने टीम इंडियात पुनरागमनासाठी गेल्या दीड वर्षात मोठी मेहनत घेतली. त्याने तब्बल १७ किलो वजन कमी केलं आणि काश्मीरमध्ये कसून सराव केला.
SARFARAZ KHAN COMEBACK

SARFARAZ KHAN COMEBACK

esakal

Updated on

नवी दिल्ली : साई सुदर्शनला दुखापत झाली आणि मुंबईकर खेळाडू सर्फराझ खानसाठी(Sarfaraz Khan ) भारतीय कसोटी संघाचे दरवाजे उघडे करण्यात आले. भारत-श्रीलंका यांच्यामध्ये १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.

या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या सर्फराझ खानने गेल्या काही काळामध्ये अफाट परिश्रम करून आपली जागा निश्चित केली आहे. त्याने १७ किलो वजन घटवले असून काश्मीरमध्येही कसून सराव केला. याचे फळ आता त्याला मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com