Virat Kohli walks past Gautam Gambhir without making eye contact after India’s win
esakal
Are Rohit Sharma, Virat Kohli and Gautam Gambhir not on good terms? : भारताच्या वन डे संघातील वातावरण चांगलं नसल्याचे वृत्त समोर येत आहे. विशेषतः रोहित शर्मा व विराट कोहली या सीनियर्स खेळाडूचं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासोबत पटत नसल्याची जोरदार चर्चा आहे. BCCI लाही याच गोष्टीचं टेंशन आलं आहे आणि त्यांनी भारत-दक्षिण आफ्रिका मालिका दरम्यान एक बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. या बैठकीत रोहित व विराट यांच्या भविष्याबाबत चर्चा होईल, असा अंदाज होता. पण, ही बैठक वन डे संघातील सीनियर्स विरुद्ध कोच व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यातल्या वाढत्या दरीबाबत चर्चा करण्यासाठी असेल. या सर्व वृत्तांना दुजोरा देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया गाजवतोय.