Shadab Khan Viral Video
Sakal
Cricket
T20 World Cup: आम्ही फायनल खेळणार... पाकिस्तानी खेळाडूचा ओव्हरकॉन्फिडन्सच तर पाहा; Viral Video
Shadab Khan Viral Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तान संघातील शादाब खानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहचेल असा दावा करतोय.
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सध्या सुपर - ८ फेरीतील सामने सुरू असून सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी शर्यत रोमांचक झाली आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले होते, त्यातून केवळ ८ संघ आता उरले आहेत. त्यामुळे या संघातून कोणते संघ ट्रॉफी जिंकू शकतात, याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशातच आता पाकिस्तान संघातील (Pakistan Cricket Team) अष्टपैलू शादाब खानचा व्हिडिओ व्हायरल (Shadab Khan Video Viral) होत आहे. ज्यात तो थेट पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहचेल असं म्हणताना दिसतोय.

