
भारताची स्फोटक महिला फलंदाज शफाली वर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. तिला नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळले होते.
तेव्हापासून अद्याप तिला पुन्हा भारतीय संघात संधी मिळालेली नाही. जेव्हा तिला संघातून वगळण्यात आले, तेव्हा तिच्या आणि कुटुंबासाठी कठीण काळ होता, याबाबत तिनेच खुलासा केला आहे.