WPL 2024 DCW vs RCBW : दिल्लीचे 11 षटकार अन् 17 चौकार! शफालीच्या तडाख्यात सापडली आरसीबी; स्मृतीचाही जबदस्त पलटावर

WPL 2024 DCW vs RCBW
WPL 2024 DCW vs RCBWesakal

WPL 2024 DCW vs RCBW : महिला प्रीमियर लीग 2024 मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 194 धावा ठोकल्या. सलामीवीर शफाली वर्माने 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा ठोकल्या. एलिस कॅप्सीने 46 धावा केल्या. तर मारिझाने काप्पने 16 चेंडूत 32 तर जेस जोनासेनने 16 चेंडूत 36 धावा ठोकल्या.

WPL 2024 DCW vs RCBW
F1 Live Streaming In India : एफ 1 च्या भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर; जाणून घ्या कधी अन् कुठं पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डिव्हाईनने लेनिनला 11 धावांवर बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर सलामीवीर शफाली वर्मा आणि एलिस कॅप्सीने धडाकेबाज फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 12 षटकात 82 धावांची भागीदारी रचली. शफालीने 31 चेंडूत 50 धावा केल्या. तर कॅप्सीने 46 धावांचे योगदान दिलं.

ही जोडी फुटल्यानंतर दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी शफाली अन् कॅप्सीचा धडाका कायम ठेवला. माझिराने कापने 200 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत 32 धावा ठोकल्या. तर जोनासेनने 16 चेंडूत 36 धावा केल्या. अरूंधती रेड्डीने 10 धावांचे योगदान दिले. यामुळे दिल्लीने 20 षटकात 5 बाद 194 धावा केल्या.

WPL 2024 DCW vs RCBW
Hardik Pandya : मला काही फरक पडत नाही... हार्दिक पांड्या अखेर 'त्या' फोटोवर बोलला

याच्या प्रत्युत्तरात खेळताना स्मृती मानधनाने धडाकेबाज सुरूवात करत संघाला पॉवर प्लेमध्ये 52 धावा करून दिल्या. यात स्मृतीच्या 28 चेंडूत 45 धावांचे मोठे योगदान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com