

Shahid Afridi | Shaheen Afridi | India vs Pakistan
Sakal
Shahid Afridi Demands Pakistan Sack Senior Trio: पाकिस्तान संघाला रविवारी (१५ फेब्रुवारी) भारतीय संघाविरुद्ध टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील पहिल्याच फेरीत लाजिरवाण्या पराभवाचा सामोरे जावे लागले. या पराभवामुळे पाकिस्तानसमोरील सुपर ८ मध्ये जाण्यचा मार्ग खडतर झाला आहे.
आता त्यांना १८ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे अन्यथा पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपेल. अशात आता पाकिस्तानी संघावर जोरदार टीका होत आहे.
यातच आता चक्क पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि मोहम्मद युसूफ (Mohammad Yousaf) यांनी खडेबोल सुनावले असून तीन अनुभवी खेळाडूंनाच संघातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तीन खेळाडूंमध्ये शाहिद आफ्रिदीचा जावई शाहिन शाह आफ्रिदीचाही (Shaheen Shah Afridi) समावेश आहे.