IRFAN PATHAN REPLY TO SHAHID AFRIDI CONTROVERSY
esakal
भारत-पाकिस्तान क्रिकेट वाद पुन्हा उफाळले असून शाहिद आफ्रिदी आणि इरफान पठाण यांच्यात शाब्दिक चकमक रंगली.
२००६ मध्ये कराचीहून लाहोर प्रवासात इरफान पठाणने आफ्रिदीबद्दल कुत्र्यासारखा भुंकतो अशी टिप्पणी केली होती.
इरफानच्या जुन्या मुलाखतीतील हा किस्सा पुन्हा व्हायरल होताच आफ्रिदीने त्यावर प्रतिक्रिया दिली.
Irfan Pathan reply to Shahid Afridi controversy: भारत-पाकिस्तान यांच्यातली भांडणं कधी न संपणारी आहेत. क्रिकेटच्या मैदानावर ते युद्धभूमीवर दोन्ही देशांमध्ये वाद होतातच.. त्यात माजी क्रिकेटपटूही एकमेकांवर आजही टीका करताना दिसत आहेत. भारतावर टीका केल्याशिवाय पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंच्या घशाखालून घास उतरत नाही. अशा क्रिकेटपटूंना भारताच्या खेळाडूंकडूनही वेळोवेळी उत्तर दिले गेले आहे. त्यात इऱफान पठाण हा पाकिस्तानींना उत्तर देण्यासाठी नेहमी पुढे राहिलेला दिसतोय. आताही त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर मोजक्या शब्दात टीका केली.