

Shai Hope | India vs West Indies 3rd ODI
Sakal
India vs West Indies 3rd ODI: वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध वनडे मालिकेत व्हाईटवॉश टाळण्यात यश मिळवले आहे. न्यू चंदिगढ येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला.
कर्णधार शाय होप (Shai Hope) वेस्ट इंडिजसाठी विजयाचा हिरो ठरला. त्याने दीडशतकी खेळी केली. पण हा सामना भारताने पराभूत झाला असला, तरी पहिले दोन सामने जिंकल्याने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
तिसऱ्या वनडेत भारताने वेस्ट इंडिजसमोर ३५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग वेस्ट इंडिजने ४८.२ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. हा वेस्ट इंडिजचा वनडेतील सर्वात मोठा लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय विक्रमी होता.