

KL Rahul Century | India vs West Indies 3rd ODI
Sakal
India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने पुन्हा एकदा वेस्ट इंडिजविरुद्ध ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) न्यू चंदिगढमध्ये सुरू आहे.
या सामन्यात भारताकडून केएल राहुलने (KL Rahul) खणखणीत शतक केले. तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी अर्धशतके केली. त्यामुळे भारताने साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडत वेस्ट इंडिजसमोर ३५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.