

Shai Hope | India vs West Indies 3rd ODI
Sakal
Shai Hope Century in India vs West Indies 3rd ODI: शनिवारी (३ ऑक्टोबर) वेस्ट इंडिजने भारतीय संघाला तिसऱ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताने दिलेल्या ३५२ धावांचे लक्ष्य ४८.३ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे वेस्ट इंडिजने वनडेतील सर्वात मोठे लक्ष्य पार केले.
पण या विजयात वेस्ट इंडिजचा खराखुरा नायक ठरला त्यांचा कर्णधार शाय होप. त्याने नाबाद दीडशतक करत संघाला विजयापर्यंत पोहचवले. त्याने दीडशतक करत अनेक विक्रमही केले.