

Shai Hope | India vs West Indies 4th T20I
Sakal
India vs West Indies 4th T20I : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात हैदराबादमध्ये चौथा टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने दमदार शतक (Shai Hope Century) साजरे केले आहे. त्यामुळे त्याने मोठे विक्रमही केले आहेत. त्याच्या शतकामुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर २४८ धावांचे लक्ष्य ठेवले.
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २४७ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून शे होपने ५० चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांसह १०२ धावांची नाबाद खेळी केली आहे. शेरफेन रुदरफोर्डने २६ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. शिमरॉन हेटमायर (३३), रोवमन पॉवेल (२४) आणि ज्वेल अँड्य्रू (२१) यांनी छोटेखानी पण महत्त्वाचे योगदान दिले.