
भारताचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूरने गेल्या काही दिवसात रणजीचे मैदान गाजवले आहे. त्याने पायाच्या दुखापतीनंतर शानदार पुनरागमन करत रणजी २०२४-२५ स्पर्धेत मुंबईच्या यशात मोलाचा वाटा उचलला. त्याने गोलंदाजीसोबतच तळात फलंदाजीनेही सर्वांचे लक्ष वेधले. तो मुंबई संघाचा मोठा आधारस्तंभ ठरताना या हंगामात दिसला आहे.
मात्र, असं असलं तरी सध्या शार्दुल भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. तसेच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारताच्या संघात स्थान मिळालेलं नाही.