Shashank Singh breaks silence on assault allegations
esakal
Shashank Singh breaks silence on assault allegations: पंजाब किंग्सचा क्रिकेटपटू शशांक सिंग आज दिवसभर चर्चेत आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे. घरच्या आचाऱ्याने शशांक व त्याच्या कुटुंबीयांविरोधात FIR दाखल करण्यात आली होती. भारतीय क्रिकेटपटूने अखेर या प्रकरणावर मौन सोडले आणि आपली बाजू मांडली. त्याने सांगितले की, त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी आचाऱ्याला ओलीस ठेवले नाही किंवा त्याला मारहाण केली नाही. तो माणूस आचारी नव्हता आणि तो चोरी करण्याच्या उद्देशाने आला असावा असा कुटुंबीयांना संशय आहे.