
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने गेल्यावर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. तो समालोचन करताना दिसला, तसेच त्याने अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. आता शिखर सर्वांसमोर लेखक म्हणूनही आला आहे.
शिखरने आत्तापर्यंत त्याच्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेटप्रेमींना भूरळ घातली होती. तो आयसीसी स्पर्धांमध्ये तर भारताचा हुकमी एक्का होता. त्याच्या खेळाव्यतिरिक्त अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बऱ्याचदा चर्चा झालेली आहे. आता या सर्व गोष्टी त्याने त्याच्या आत्मचरित्रातून मांडल्या आहेत.