
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेवरून गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद होत आहेत. पाकिस्तान या स्पर्धेचे अधिकृत आयोजक आहेत. पण या स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्ताननेही ताठर भूमिका घेतली होती.
परंतु, दोन दिवसांपूर्वी आयसीसीच्या बैठकीनंतर हायब्रिड मॉडेलनुसार ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय झाल्याचे समजत आहे. परंतु, पाकिस्तानने काही अटीही ठेवल्याचे मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आले होते.