
थोडक्यात:
इंग्लंडने भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटी २२ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
शेवटची विकेट घेणाऱ्या शोएब बशीरच्या बोटाला दुखापत होऊन तो मालिकेतून बाहेर गेला.
भारत १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ १७० धावांवर ऑलआउट झाला.
इंग्लंड क्रिकेट संघाने सोमवारी (१४ जुलै) भारताविरुद्ध लॉर्ड्ला झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात २२ धावांनी विजय मिळवला. पाचव्या दिवसापर्यंत अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्याने पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांनी २-१ अशी आघाडी घेतली आहे.
आता अद्याप दोन सामने बाकी आहेत. चौथा सामना मँचेस्टरला होणार आहे, तर लंडनला पाचवा सामना होणार आहे. पण असे असतानाच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.