

Shoaib Malik Breaks Silence on Fourth Marriage Rumours
Sakal
Shoaib Malik Denies New Marriage Claims: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चांवर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती की शोएब मलिक (Shoaib Malik) २७ फेब्रुवारीला पाकिस्तानची अभिनेत्री वानिझा सत्तर हिच्याशी लग्न करणार होता.
या चर्चांवर रविवारी शोएबने स्टेटमेंट जाहीर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या केवळ अफवा (Marriage Rumors) असल्याचे म्हणत त्याचा कुटुंबावर आणि त्याच्या मुलावर परिणाम असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्याने त्याचे दोनच लग्न झाल्याचे म्हटले आहे.