AB de Villiers World XI without Sachin Tendulkar and Brian Lara : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने त्याच्या आवडत्या सर्वोत्तम वर्ल्ड इलेव्हन संघाची निवड केली आहे, ज्यामध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ४१ वर्षीय एबी डिव्हिलियर्स सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) मध्ये दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील प्रेझेंटर शेफाली बग्गाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये डिव्हिलियर्सने त्याचा सर्वोत्तम खेळाडूंचा जागतिक संघ निवडला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू हेडन यांना सलामीची जबाबदारी दिली आहे.