Viral cricket fight video between South Africa and Bangladesh players : ढाका येथे बांगलादेश इमर्जिंग टीम आणि दक्षिण आफ्रिका इमर्जिंग टीम यांच्यातील चार दिवसांच्या रेड-बॉल सामन्यादरम्यान राडा पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज त्शेपो एनतुली आणि बांगलादेशचा फलंदाज रिपन मोंडल यांच्यात हाणामारी झाली. आफ्रिकन गोलंदाजाने तर दोन-तीन चापटी बांगलादेशी फलंदाजाच्या हेल्मेटवर लगावले. त्याने हेल्मेट ओढलेही आणि वाद आणखी चिघळण्यापूर्वी अम्पायरने धाव घेतली. मैदानावरील पंचांनी अद्याप या घटनेचा अधिकृत अहवाल सादर केलेला नाही, त्यानंतर दंड जाहीर केला जाईल.