WPL 2024: '... तेव्हा माझ्यातली बिस्ट जागी होते', पर्पल कॅप जिंकणारी RCB ची श्रेयंका पाटील नक्की काय म्हणाली? वाचा

Shreyanka Patil: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला WPL 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकून देण्यात 21 वर्षीय श्रेयंकाने मोलाचा वाटा उचलला. तिने या हंगामातील पर्पल कॅपही जिंकली.
Shreyanka Patil - Smriti Mandhana | RCB | WPL 2024
Shreyanka Patil - Smriti Mandhana | RCB | WPL 2024Sakal

Shreyanka Patil News: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. रविवारी (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का आणि ट्रॉफीवर नाव कोरले.

बेंगलोरच्या या विजयात 21 वर्षीय अष्टपैलू श्रेयंका पाटीलने मोलाचा वाटा उचलला. तिने अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर डब्ल्युपीएल 2024 हंगामात पर्पल कॅपही जिंकली. पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते. श्रेयंकाने यंदाच्या हंगामात 8 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या.

तिने सामन्यानंतर म्हटले की खेळपट्टी थोडी जरी फिरकीला साथ देणारी असली, तरी ती एक वेगळी बिस्ट (पशू) बनते.

Shreyanka Patil - Smriti Mandhana | RCB | WPL 2024
Smriti Mandhana: 'आता ए साला कप नामदू म्हणायचं', RCB च्या विजयानंतर असं का म्हणाली मानधना?

ती म्हणाली, 'मला मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करायला मजा येते. दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली होती. पण आम्ही हार मानली नव्हती.'

'आम्हाला माहित होते की एका विकेटची गरज होती. जेव्हा आम्हाला पहिली विकेट मिळाली, त्यानंतर आम्ही म्हणालो ठिक आहे आता अजून एक, असे करत आम्ही शेवटपर्यंत लढलो.'

'आत्तापर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. खेळपट्टीमध्ये काहीतरी नक्की होते. खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याचे मला दिसताच माझ्यातला वेगळा पशू जागा होतो.'

याशिवाय तिने सांगितले की साखळी फेरीत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना तिला डाव्या हाताला अगदी छोटे फ्रॅक्टर झाले होते. पण, त्यानंतर तिने शानदार पुनरागमन केले.

Shreyanka Patil - Smriti Mandhana | RCB | WPL 2024
WPL Prize Money : विजेतेपद जिंकल्यानंतर RCB झाली मालामाल! पाकिस्तान सुपर लीगपेक्षाही मिळाले दुप्पट पैसे

ती म्हणाली, 'मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना मला छोटे फ्रॅक्चर झाले होते, ज्यामुळे मला दोन सामने खेळता आले नाहीत. पण मला पुन्हा कमी काळात मैदानात आणण्याचे श्रेय फिजिओला जाते.'

श्रेयंकाने अंतिम सामन्यात दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगला 23 धावांवर बाद केले होते. त्यानंतर तिने दिल्लीच्या शेवटच्या चारपैकी तीन विकेट्स घेतल्या होत्या.

या सामन्यात दिल्लीने बेंगळुरूला विजयासाठी 114 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग बेंगळुरूने 19.3 षटकात 2 विकेट्स गमावत 115 धावा करून सहज पूर्ण केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com