Shreyanka Patil celebrates her five-wicket haul during RCB vs Gujarat Giants
esakal
Shreyanka Patil 5 wickets RCB vs Gujarat Giants WPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात RCB ने ३२ धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरला. बंगळुरूच्या विजयात श्रेयांका पाटीलसह रिचा घोष व राधा यादव या चमकल्या.