
Syed Mushtaq Ali Trophy 2024 Baroda vs Karnataka: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२४ स्पर्धेत अनेक संघांचे खेळाडू चमकत आहेत. मंगळवारी (३ डिसेंबर) कर्नाटककडून खेळणारा ३१ वर्षीय फिरकीपटू श्रेयस गोपळने मोठा पराक्रम केला आहे.
त्याने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत दुसऱ्यांदा हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. मंगळवारी कर्नाटक विरुद्ध बडोदा संघात इंदूरमध्ये सामना झाला हा सामना बडोद्याने जिंकला. पण या सामन्यात श्रेयसने हॅट्रिक घेत सर्वांचे लक्ष वेधले.