Shreyas Iyer has informed BCCI about his six-month break from red-ball cricket
esakal
Shreyas Iyer six-month break from red-ball cricket 2025 : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा IND vs WI कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयने आज ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या तीन वन डे सामन्यांसाठीचा भारत अ संघ जाहीर केला. त्याचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे, पण या निवेदनाच्या शेवटी महत्त्वाचे अपडेट्सही दिल्या गेल्या आहेत. श्रेयस अय्यर पुढील सहा महिने रेड बॉल क्रिकेट ( कसोटी क्रिकेट) पासून दूर राहणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले.