Shreyas Iyer under medical supervision in Sydney after rib cage injury
esakal
Shreyas Iyer rib cage internal bleeding details: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात झेल घेताना बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा उप कर्णधार श्रेयस अय्यर याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर त्याला तातडीने सिडनी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. आता त्याच्या दुखापतीचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आल्या आहेत आणि उप कर्णधाराला ICU मध्ये दाखल केले गेले आहे. त्याला पुढील ५-७ दिवस वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.