Shreyas Iyer Ishan Kishan
Shreyas Iyer Ishan KishanESAKAL

BCCI Annual Contract : अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं! बीसीसीआयनं अय्यर, किशनचा विषयच संपवला?

Shreyas Iyer Ishan Kishan : बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला. तर दोन वरिष्ठ खेळाडूंना नारळ दिला.

Shreyas Iyer Ishan Kishan Dropped From BCCI Annual Contract : बीसीसीआने नुकतेच 2023 - 24 साठी केंद्रीय कराराची यादी जाहीर केली. या यादीतून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांनीही बीसीसीआयची आदेश डावलून रणजी ट्रॉफी खेळण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे करारातून वगळून एकप्रकारे त्यांच्यावर कारवाई केल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहे.

Shreyas Iyer Ishan Kishan
Hanuma Vihari Controversy : तो काही असा-तसा खेळाडू वाटला का.... विहारी प्रकरणावरून माजी क्रिकेटपटू भडकला

बीसीसीआयने 2023 - 24 या वर्षासाठी आपल्या करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. यातून अपेक्षेप्रमाणे इशान किशन आणि श्रेयस अय्यरचे नाव वगण्यात आलं आहे. या दोघांनही बीसीसीआयचा रणजी ट्रॉफी खेळण्याचा आदेश धुडकावला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं दिसत आहे.

ग्रेड A+ मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू भारताकडून सर्व फॉरमॅटममध्ये खेळतात. तर ग्रेड A मध्ये रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला आहे.

Shreyas Iyer Ishan Kishan
Hanuma Vihari Controversy : तो काही असा-तसा खेळाडू वाटला का.... विहारी प्रकरणावरून माजी क्रिकेटपटू भडकला

A+ ग्रेड

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

A ग्रेड

आर अश्विन, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

B ग्रेड

सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

C ग्रेड

रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

Shreyas Iyer Ishan Kishan
Hardik Pandya : हेल्मेटमुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार पांड्या सापडला अडचणीत? मोडला BCCI चा मोठा नियम

निवड समितीने आकाश दीप, विजयकुमार विशक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा या खेळाडूंसाठी वेगवान गोलंदाजी कराराची शिफारस देखील केली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com