IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

India vs Japan T20I Match: जपानमध्ये पहिल्यांदाच खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय टी२० संघाने विजय मिळवला आहे. जपानविरुद्ध भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी राहिली. त्यांना फक्त २ चौकार मारता आले, मात्र गोलंदाजांनी संघाला विजयापर्यंत पोहचवले.
India Win Over Japan

India Win Over Japan

Sakal

Updated on

India won by 2 runs over Japan: भारत विरुद्ध जपान पुरुष संघांमध्ये एकमेव टी२० सामना मंगळवारी (२२ सप्टेंबर) सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राऊंडवर झाला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने फक्त २ धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्यांदाच जपानमध्ये खेळताना हा विजय मिळवला. त्यामुळे हा विजय खास ठरला.

भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे होत असल्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या या सामन्याला सुझुकी कप असे नाव देण्यात आले आहे. मात्र सानोमध्ये मंगळवारी पाऊस झाल्याने हा सामना ५-५ षटकांचाच करण्यात आला होता.

India Win Over Japan
IND vs JPN, Playing XI: जसप्रीत बुमराह संघाबाहेर, वैभव सूर्यवंशीला मिळाली का संधी? पावसामुळे किती ओव्हरची होणार मॅच?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com