
Shreyas Iyer comeback in Test and T20 formats : श्रेयस अय्यरकडे निवड समिती काणा डोळा करत असली तरी त्याचे यश त्यांना दखल घेण्यास भाग पाडत आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये त्याने कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध केले आणि फलंदाजीतही त्याने पंजाब किंग्ससाठी उल्लेखनीय कामगिरी केली. आयपीएल २०२५ मध्ये तो पंजाब किंग्सला जवळपास ११ वर्षांनी फायनलमध्ये घेऊन गेला. पण, फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून संघाचा पराभव झाल्याने श्रेयसला अपेक्षित शेवट करता आला नाही. पण, श्रेयसच्या कामगिरीची दखल बीसीसीआयने घेतली आहे.