
भारत अ संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दोन चार दिवसीय व तीन वन डे सामने खेळणार आहे.
इंग्लंड दौरा आणि आशिया कपमधून वगळलेला श्रेयस अय्यर भारत अ संघाचा कर्णधार ठरला आहे.
पहिला सामना १६ सप्टेंबरला लखनौ येथे, तर दुसरा २३ सप्टेंबरला होणार आहे.
India A vs Australia A 2025 squad announcement details : भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या तयारीला टीम इंडियाने सुरुवात केली आहे आणि ज्या खेळाडूंची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झालेली नाही, त्यांना तयारीसाठी संधी दिली आहे.