

Shreyas Iyer | India vs New Zealand T20I
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी२०मालिकेतील पहिले तीन सामने जिंकलेले असल्याने मालिका आधीच जिंकली आहे. पण असे असले तरी भारतीय संघाला शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी२० सामन्यात ८७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता भारतीय संघाची न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची संधी हुकली आहे. या पराभवाबाबत सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.