

Arshdeep Singh | Glenn Phillips | India vs New Zealand T20I
Sakal
New Zealand vs India 4th T20I : न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा भारताविरुद्ध वादळी खेळ केला आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) ऑकलंडला झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर फिलिप्सच्या शतकाच्या (Glenn Phillips Century) जोरावर २६० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण असे असले तरी याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही (Arshdeep Singh) विक्रम केला आहे.